महाराष्ट्र राज्यात विवाह करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी अनिवार्य करा
प्रदेशाध्यक्ष संभाजी राजे दहातोंडे यांची मागणी
मुंबई, दि २३
गुजरात सरकारच्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्र विधानसभेत विवाह नोंदणी नियमात सुधारणा मसुदा सादर करुन, विवाह करण्यासाठी आई-वडील तथा पालकांची परवानगी आवश्यक आणि अनिवार्य करा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिवेशनादरम्यान केली.
गुजरात सरकारने विधानसभेत विवाह- नोंदणी नियमांत सुधारणांचा मसुदा सादर होण माहे, प्रस्तावित सुधारणेनुसार आता -प्रेमविवाहासाठी अर्ज केल्यानंतर मुलगा-मुलगीच्या पालकांना
नोटीस किंवा व्हाट्सअपच्या माध्यमातून सूचित केले जाईल आणि अर्जाच्या ४० व्या दिवशी विवाहाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे राज्यात अशी एक व्यवस्था तमार देती आहे. ज्यामुळे पालकांच्या परवानगीने विवाह करणाऱ्यांना आणि प्रेमविवाहात आपली खोटी ओळख न दाखवणा-यांना कोणतीही अडचण येणार नाही. नवीन व्यवस्थेत एफिडेविट आणि नोटरीचे काम सर्वांच्या उपस्थितीत करावे लागेल. राज्य सरकार प्रेमविवाहाच्या विरोधात नाही, परंतु मुलींची सुरक्षा, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया मजबूत करण्यासाठी विवाह नोंदणी नियमात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. ज्या माध्यमातून सरकारकडे नोंदणी करणे देखील अनिवार्य असेल.
अशा प्रकारे आपण महाराष्ट्र राज्यात विधानसभेन अधिवेशन दरम्यान विवाह कायद्यात नियमात सुधारणा करावी. जेणेकरून विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी राजे दहातोंडे यांनी दिली.KK/ML/MS