समलैंगिक विवाहासाठी आता नवे घटनापीठ
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क):देशामध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाकडून याबाबत त्वरेने पावले उचलून कार्यवाही होणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. याबाबत आजसुप्रीम कोर्टाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाला सूचित केले जे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी याचिकांवर सुनावणी करेल. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, रवींद्र भट, हिमा कोहली आणि पीएस नरसिंहा 18 एप्रिलपासून या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.या घटनापीठामुळे समलैंगिक व्यक्तींना कायदेशीर हक्क मिळवून देण्याच्या लढ्याला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
SL/KA/PGB 14 APR 2023