गुढीपाडव्यापासून विठ्ठलाची तुळशी पूजा पुन्हा सुरू

 गुढीपाडव्यापासून विठ्ठलाची तुळशी पूजा पुन्हा सुरू

पंढरपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सावळ्या विठुरायाची तुळशी पूजा आता गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत घेण्यात आला.Vitthal’s Tulsi Puja resumes from Gudi Padwa

त्याचबरोबर पंढरपूर तीर्थक्षेत्री आणि मंदिर परिसरात स्वच्छता राखली जावी. यासाठी आता मंदिर समिती ही योगदान देणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून स्वच्छ पंढरपूर रहावे. यासाठी घंटागाडी देखील विकत घेतली जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे Shri Vitthal Rukmini Temples समितीची बैठक मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तर यावेळी कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ML/KA/PGB
16 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *