गंगोत्रीहून आणलेल्या गंगा जलाने विठ्ठलास जलाभिषेक

 गंगोत्रीहून आणलेल्या गंगा जलाने विठ्ठलास जलाभिषेक

सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाशिवरात्री निमित्त शनिवारी रात्री उशिराने विठ्ठलाला, होळकर संस्थान कडून गंगोत्री येथून आणलेल्या गंगाजलाने अभिषेक करण्यात आला.Vitthalas Jalabhishek with Ganges water brought from Gangotri

गेले 253 वर्षापासून पंढरपुरात होळकर संस्थान कडून महाशिवरात्र दिवशी विठ्ठलास जलाभिषेक होतो ही परंपरा आजही कायम आहे.

‘हरि-हरा नाही भेद’ म्हणून पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. विठ्ठलाच्या मस्तकावर साक्षात शिवलिंग आहे. म्हणूनच बारा ज्योतिर्लिंगा नंतर पंढरपूरच्या विठ्ठलास देखील ज्योतिर्लिंग म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विठ्ठलाची भक्ती केली. आणि यातूनच आज महाशिवरात्री दिवशी रात्री बारा वाजता होळकर संस्थान कडून विठ्ठलास जलाभिषेक केला जातो.

या जलाभिषेकासाठी थेट गंगोत्री येथून गंगाजल पंढरपुरात आणण्यात आले आहे. ह्याच गंगाजलापासून रात्री बारा वाजता विठ्ठलास जलाभिषेक केला गेला. यासाठी होळकर संस्थांनचे आदित्य फत्तेपुरकर यांच्याकडून गंगाजल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस हस्तांतरण झाले. आणि सुमारे 253 वर्षाची महाशिवरात्री दिवशी होळकर संस्थान कडून असणारी जलाभिषेकाची परंपरा कायम राखली गेली .

ML/KA/PGB
19 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *