सावळाराम असणारे विठ्ठल मंदिर झाले राममय

सोलापूर दि २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राम रंगी रंगले मन…, विश्वरंगी रंगले… अयोध्या येथे रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज होत आहे. या निमित्ताने पंढरपूरचा सावळाराम अर्थात विठ्ठलाचे मंदिर हे आकर्षक झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले. संपूर्ण मंदिर हे भगवामय आणि राममय झालेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नामदेव पायरी येथे राम लक्ष्मण सीताच्या फुलांमधील आकर्षक प्रतिमा लावण्यात आले आहेत. तर पश्चिमद्वार येथे वीस फुटाची राम मूर्ती उभी करण्यात आली आहे.
ML/KA/SL
22 Jan. 2024