झेंडूच्या सुवर्णकांतीत रंगले विट्ठल मंदीर

सोलापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या आजच्या विजयादशमीच्या निमित्ताने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर झेंडूच्या सुवर्णकांतीत रंगलेले दिसून येत आहे. विजयादशमी अर्थात दसरा निमित्त पुणे येथील भविक राम जांभुळकर यांनी तब्बल सहा टन झेंडूच्या फुलांपासून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहास आकर्षक सजावट अर्पण केली आहे. दसऱ्या दिवशी महत्त्व असणाऱ्या आपट्याच्या पानाची प्रतिकृती देखील या सजावटीमध्ये उभारली गेली.Vitthal temple painted with golden beads of marigold
त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे सावळे सुंदर व सगुण साकार असणारे रूप झेंडूच्या सुवर्णकांतीत अधिक खुललेले दिसून आले. दसऱ्या निमित्त पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
ML/KA/PGB
24 Oct 2023