आज पासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन….
सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणीचे आज मंगळवार पासून २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. 20 जून ते 7 जुलै दरम्यान 24 तास दर्शन सुरू असणार आहे. या काळात विठुरायाचे सर्व राजोपचार बंद होऊन केवळ पहाटेची नित्य पूजा होणार आहे. तसेच व्हीआयपी व ऑनलाईन दर्शन बुकिंगही बंद असणार आहे. आज सकाळी 11 वाजता मंदिरे समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढला. आणि देवाच्या पाठीशी मऊ – मुलायम लोड ठेवण्यात आला. त्यानंतर २४ तास दर्शनाचा शुभारंभ झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आषाढी यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. या काळात प्रत्येक मिनीटाला 35 ते 40 भाविक दर्शन घेउ शकतील. असे नियोजन मंदिर प्रशासनाने केले आहे.
ML/KA/PGB 20 Jun 2023