विठ्ठल दर्शन यात्रा रेल्वे रवाना
बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून आषाढी एकादशी करीता भाविकांसाठी विठ्ठल दर्शन यात्रा एक्स्प्रेस ही विशेष 16 डब्यांची रेल्वे सोडण्यात आली. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या विशेष रेल्वे ला हिरवी झेंडी दाखविली. या वेळी या विभागाचे आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा हे उपस्थित होते.Vitthal Darshan Yatra train departs
हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेऊन पंढरपूर कडे या रेल्वेद्वारे प्रयाण केले शहरातील समाजसेवी संस्था, राजकीय पक्षांनी भाविकांना चहा फराळाचे या वेळी वाटप केले. रेल्वे विभागाचे स्टेशन प्रबंदक संतोष अनासाने, चालक एस एस काकडे, परिवहन निरीक्षक मोहन देशपांडे आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला .
ML/KA/PGB
26 Jun 2023