Vistara Airline चे टाटा कंपनीमध्ये होणार विलिनीकरण

 Vistara Airline चे टाटा कंपनीमध्ये होणार विलिनीकरण

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंगापूर एअरलाइन्सला विस्ताराचे एअर इंडियामध्ये प्रस्तावित विलीनीकरणाचा भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) भारत सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहासोबत संयुक्तपणे विस्तारा चालवते. या मान्यतेमुळे या वर्षाच्या अखेरीस विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये 25.1 टक्के हिस्सा मिळेल. या करारानंतर एअर इंडिया जगातील सर्वात मोठ्या एअरलाइन समूहांपैकी एक होईल.

विमान कंपनी विस्ताराचे प्रवासी 3 सप्टेंबरनंतर प्रवासी तिकिट बुकिंग करू शकणार नाहीत. विस्ताराने सांगितले की, आता प्रवासी 3 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर 2024 किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी विस्तारासोबत बुकिंग करू शकणार नाहीत. विस्तारा विमानांचा एअर इंडियाच्या कामकाजात समावेश केला जाईल आणि सध्या चालवल्या जाणाऱ्या मार्गांचे बुकिंग एअर इंडियाच्या वेबसाइटवर केले जाईल. विस्तारा 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत बुकिंग घेणे आणि फ्लाइट चालवणे सुरू ठेवेल. विस्ताराची सर्व विमाने 11 नोव्हेंबरनंतर एअर इंडियाद्वारे चालवली जातील. विस्तारा फ्लाइटचे फ्लाइट क्रमांक देखील 12 नोव्हेंबर 2024 रोजी किंवा त्यानंतर एअर इंडिया कोडमध्ये बदलतील.

या प्रस्तावित विलीनीकरणाची घोषणा नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आली. एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची आहे. तर विस्तारा ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्समधील 51:49 चा संयुक्त उपक्रम आहे. सध्या टाटा समूहाचा विस्तारामध्ये 51 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्सचा 49 टक्के हिस्सा आहे.सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडियामध्ये विस्ताराचे प्रस्तावित विलीनीकरणाचा एक भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी भारत सरकारकडून मंजुरी मिळवली आहे, असे सिंगापूर एअरलाइन्सने शुक्रवारी सिंगापूर शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

SL/ML/SL

30 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *