विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले…

 विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले…

नांदेड दि २४ :- गोदावरी नदीवरील जायकवाडी, माजलगांव, येलदरी , सिद्धेश्वर, दिग्रस अशा सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नांदेड च्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या भागात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. गोदावरी नदी इशारा पातळीजवळ पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोदावरी नदीची इशारा पातळी ३५१ मीटर आहे. रात्री साडे आठ च्या सुमारास ३५०.४५ मीटर येवढी पाणी पातळी आहे. प्रकल्पाच्या १६ दरवाज्यातून सध्या २ लाख ४८ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संभाव्य पूर परिस्थिती वर लक्ष ठेऊन असून आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *