ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर

मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य अभिनेत्री, श्रीमती सुहासिनी ऊर्फ सुहास जोशी यांना रंगभूमीवरील मानाचे विष्णुदास भावे गौरवपदक घोषित झाले आहे.अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या 5 नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा हा 56वा पुरस्कार आहे.सुहास जोशी यांनी गेली अनेक वर्षे मराठी, हिंदी चित्रपट, नाटकं, मालिका यांमधून अभिनय करून आपला ठसा उमटविला आहे.