अमेरिकेतील 45 टक्के भारतीयांच्या डोक्यावर व्हिसाची टांगती तलवार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना ‘भारतात भरती थांबवण्यास’ सांगितले आहे. यावर ‘ब्लाइंड’च्या सर्वेक्षणात 63 टक्के अमेरिकन व्यावसायिकांना असे वाटले की, या निर्णयाचा त्यांच्या कंपन्यांना फायदा होईल, तर 69 टक्के भारतीय व्यावसायिकांनी तोटा होईल असे सांगितले. त्याचबरोबर, अमेरिकेच्या व्हिसा नियमांमध्येही (Visa rules) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत H-1B किंवा L-1 व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांसाठी (H1B visa India return) मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. नोकरी गमावल्यास मायदेशी परतण्याची तयारी अनेकांनी दर्शवली आहे. एका सर्वेक्षणामध्ये याबाबत माहिती समोर आली आहे.
नोकरी गमावल्यास कुठे जायचे, या प्रश्नावर 45% भारतीय व्यावसायिक मायदेशी परतण्याचा (Return to India विचार करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘ब्लाइंड’ या ॲपवर घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 26 टक्के लोकांनी दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर 29 टक्के अजूनही अनिश्चित आहेत.
सर्वेक्षणानुसार, भारतीयांना भारतात परत येताना काही गोष्टींचा त्यांना अडथळा वाटत आहे
वेतन कपात – 25%
आयुष्याच्या दर्जा कमी होणे – 24%
नोकरीच्या संधी कमी असणे – 10%
सांस्कृतिक किंवा कौटुंबिक समायोजन – 13%
याशिवाय, ‘पुन्हा अमेरिकेचा व्हिसा घ्याल का?’ या प्रश्नावर फक्त 35 टक्के लोकांनी ‘हो’ म्हटले. उर्वरित 65 टक्के लोकांचा याबाबत नकारात्मक किंवा अनिश्चित प्रतिसाद आहे.