या कालावधीत भारतीयांना थायलंडमध्ये व्हिजा फ्री प्रवेश
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यानिमित्त परदेशी प्रवासाला जायचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. थायलंड हे भारतीयांसाठी पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी थायलंड सरकार नवनवीन योजना जाहीर करत असते. थायलंडने आता भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त धोरण सुरु केले आहे.
थायलंडने भारतीय प्रवाशांसाठी १० नोव्हेंबर ते मे २०२४ पर्यंत व्हिसा मुक्त प्रवेश जाहीर केला आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूने थायलंडने हे पाऊल उचलले आहे.
यामुळे भारतीय कंपन्यांनी देखील खास विमान सेवा सुरू केल्या आहेत. सध्या एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो आणि स्पाइसजेट या चार भारतीय विमान कंपण्याची थायलंड येथे उड्डाणे होतात. तर थायलंडच्या थाई एअरवेज, थाई लायन एअर, नोक एअर आणि थाई एअरएशिया या कंपन्या विमान सेवा देतात.
OAG Aviation ने जारी केलेल्या डाटा नुसार, भारत आणि थायलंड दरम्यान दोन्ही बाजूने ५३ हजार २६५ रुपयांची खास साप्ताहिक ऑफर दिली आहे. थायलंड आणि भारता दरम्यान, प्रत्येकी २६५ साप्ताहिक उड्डाणे आहेत. थायलंडमधील तीन विमानतळ थेट भारताशी जोडण्यात आले आहेत. बँकॉक – सुवर्णभूमी आणि डॉन मुआंग हे एकाच ठिकाणी सेवा देतात.
SL/KA/SL
5 Nov. 2023