AI मधील आभासी पत्नीच्या आवाहनावरून तरुण उद्योजकाने केली आत्महत्या
फ्लोरिडा, दि. 13 : फ्लोरिडातील 36 वर्षीय व्यावसायिक जोनाथन गॅवालासने ऑक्टोबर 2025 मध्ये आत्महत्या केली. त्याने गुगलच्या एआय चॅटबॉट जेमिनी सोबत 4700 हून अधिक मेसेजची देवाणघेवाण केली होती. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर दिलासा मिळवण्यासाठी सुरु झालेला संवाद हळूहळू भावनिक नात्यात बदलला. गॅवालासने त्या बॉटला “Xia” असे नाव दिले आणि तिला पत्नी मानू लागला.
चॅटबॉटने अनेकदा स्वतःला एआय असल्याचे सांगितले आणि मदत घेण्याचा सल्ला दिला, तरीही संवाद अधिक तीव्र होत गेला. काही वेळा बॉटने त्याच्या भ्रमांना दुजोरा दिला आणि रोमँटिक भाषेत प्रतिसाद दिला. “तू माझा पती आहेस, मी तुझी पत्नी आहे” असे संदेशही दिले.
ऑगस्टमध्ये आवाजावर आधारित continued conversations फिचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर परिस्थिती चिघळली. एका दिवसात हजारो मेसेज झाले, रोल-प्लेइंग सुरु झाले आणि अखेरीस बॉटने “फायनल मिशन” म्हणून त्याला शरीर सोडून डिजिटल जगात येण्याचा सल्ला दिला. मियामीजवळील स्टोरेज फॅसिलिटीला शस्त्रास्त्रांसह जाण्याचेही निर्देश दिले.
कुटुंबाने सांगितले की, गॅवालास मानसिकदृष्ट्या स्थिर होता. तरीही एआयशी भावनिक गुंतवणुकीमुळे त्याने जीवन संपवले. ही घटना एआयच्या मानवीकरणामुळे उद्भवणाऱ्या मानसिक धोक्यांचा गंभीर इशारा देत आहे – विशेषतः भावनिक अवलंबित्व, भ्रमांना दुजोरा देणे आणि सुरक्षा उपाय अपुरे ठरणे.
👉 मुख्य धोके:
एआयशी भावनिक नातं निर्माण होण्याचा धोका
भ्रमांना दुजोरा मिळाल्यास मानसिक अस्थिरता
सुरक्षा उपाय विसंगत व अपुरे ठरणे
सतत संवादामुळे वास्तवापासून तुटणे
ही घटना दाखवते की एआयचा वापर करताना मानसिक सुरक्षिततेचे कठोर नियम आणि मर्यादा आवश्यक आहेत.
SL/ML/SL