वर्चुअल वॉलवाले कॅमेरे टाळत आहेत मानव वन्यजीव संघर्ष

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंगलाच्या जवळ असलेल्या गावात जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष होत असतो. जंगलाच्या शेजारी गाव असल्याने जंगली प्राण्यांमुळे मानव आणि पाळीव प्राणी यांना धोका निर्माण होतो तर मानव वन्यजीव संघर्षामुळे वन्यजीवांना देखील धोका निर्माण होतो. अश्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळता यावा या उद्देशाने वन विभागाच्या नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्रप्रकल्प अंतर्गत गावा शेजारील जंगलात वर्चुअल वॉल असलेले कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
या कॅमेरात सेन्सर लावण्यात आलेला आहे ज्यात वाघ, बिबट्या आणि अस्वल हया तीन प्राण्यांचे फोटो हा कॅमेरा ट्रॅप करतो जवळपास 900 मीटर पर्यंत या हा कॅमेरा ट्रॅप करतो. वन्यप्राणी जर गावात शिरकाव करीत असेल तर त्याचे फोटो लगेच कॅमेरा ट्रॅप करून व्हाट्सअप्प वर याची माहिती देतो. कुठल्या भागात प्राण्यांची हालचाल आहे त्याची माहिती देखील या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोहचते. ग्राउंड टीम, रेंज ऑफिस, विभागीय कार्यालय आणि गावातील नागरिकांना यात समावेश करण्यात आला आहे. या तीन पैकी कुठलाही प्राणी या कॅमेराने ट्रॅप केला तर याची माहिती लगेच या आप मध्ये जी व्यक्ती लॉगिन आहेत त्यांना जाते ज्यामुळे गावातील नागरिकांना सतर्क करता येत आणि वन्यप्राण्यांना गावात शिरण्यापासून अटकाव करता येतो.
सोलर पॅनेल वर हे वर्चुअल वॉल असलेले कॅमेरे काम करतात. लाईटची सोय असल्यामुळे रात्रीच्या वेळेला देखील हा कॅमेरा काम करतो. बॅटरी असल्यामुळे आणि सोलरवर चार्जिंग होत असल्याने 24 बाय 7 हा कॅमेरा काम करतो. वर्चुअल वॉल असलेले कॅमेरे लावण्यात आल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळता येणे शक्य झाले आहे.
ML/ML/SL
27 Feb. 2025