विराट कोहलीने मोडला तेंडुलकरचा रेकॉर्ड
बंगळुरु, दि.२४ : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आंध्रविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 16 हजार लिस्ट-ए धावांचा टप्पा सर्वात वेगाने गाठला. हा मैलाचा दगड त्याने केवळ 330 डावांत गाठला, तर तेंडुलकरला यासाठी 391 डाव लागले होते. विराट कोहलीने आज (24 डिसेंबर 2025) बेंगळुरूतील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात हा विक्रम केला. दिल्ली संघाकडून खेळताना आंध्रविरुद्धच्या सामन्यात कोहलीने पहिल्याच धावेसह 16 हजार लिस्ट-ए धावांचा टप्पा गाठला. यामुळे तो सर्वात वेगाने 16 हजार धावा करणारा खेळाडू ठरला.
कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत तब्बल 15 वर्षांनंतर पुनरागमन केले. शेवटचे त्याने 2010-11 हंगामात दिल्ली संघाचे नेतृत्व केले होते. या पुनरागमनातच त्याने विक्रम मोडून क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. या स्पर्धेत इतर वरिष्ठ खेळाडूंनीही चमक दाखवली. रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध फक्त 62 चेंडूत शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा दिवस दुहेरी आनंदाचा ठरला