विरार इमारत दुर्घटनेत 17 नागरिकांचा मृत्यू, मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख.

 विरार इमारत दुर्घटनेत 17 नागरिकांचा मृत्यू, मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख.

वसई दि २८:– पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मंगळवारी रात्रीपासून महानगरपालिका आणि एन.डी.आर.एफ च्या 2 टीम यांच्या माध्यमातुन घटनास्थळी मलब्या खालून नागरिकांना शोधण्याचं कार्य सुरू होत.

विरार मधल्या नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग खाली असलेल्या चाळीवर कोसळून ही दुर्घटना घडली. ती चाळ पूर्णपणे उध्वस्त झाली. या अपार्टमेंट मध्ये ५० सदनिका होत्या. त्यापैकी अंदाजे १२ सदनिका कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेचा आढावा घेऊन या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *