विरार येथे इमारत कोसळून दोघांचा मृत्यू…

वसई दि २७– वसई तालुक्यातील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मधील असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार माळ्याच्या इमारतीचा मागील भाग इमारती खाली असलेल्या चाळीवर कोसळला असून त्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.
दुर्घटना घडली आहे त्यामध्ये रहिवासी अडकले असल्याने त्यांचे बचाव कार्य वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफ 2 टीमच्या मदतीने चालू आहे. आत्ता पर्यंत 11 लोकांना मलब्या खालून बाहेर काढले असून विरार आणि नाला सोपारा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
- प्रभाकर शिंदे वय ५७
- प्रमिला प्रभाकर शिंदे वय ५०
- प्रेरणा शिंदे २०
राहणार रमाबाई इमारत
रिद्धी विनायक हॉस्पिटल येथे दाखल. - आरोही ओंकार जोवील वय २४ (मयत )
- विशाखा जोविल वय २४
- मंथन शिंदे वय १९
- प्रदीप कदम ४० प्रथमोपचार नंतर सोडले
- जयश्री कदम ३३ प्रथमोपचार नंतर सोडले
प्रकृती हॉस्पिटल बोलिंज - उत्कर्षा जोविल वय १ ( मयत )
चंदनसार हॉस्पिटल विरार - संजॉय सिंग वय २४
- मिताली परमार वय २८ (प्रथमोपचार नंतर सोडले )
संजीवनी हॉस्पिटल विरार. ML/ML/MS