विकली जाणार VIP कंपनी

 विकली जाणार VIP कंपनी

मुंबई, दि. २८ : VIP या प्रवासी बॅग व इतर वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी विकण्याचा निर्णय कंपनीची मालकी असलेल्या पिरामल कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांनी या कंपनीतील ३२ टक्के समभाग विकण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मल्टीपल्स इक्विटीने हे समभाग (Indian business new)खरेदी करण्यासाठी व्यवसाय नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला आहे.(Indian company takeover)प्रायव्हेट इक्विटी, संमविभाग सिक्युरिटी, प्रोफिटेक्स शेअर्स आदी कंपन्या एकत्र येऊन व्हीआयपी कंपनीतील समभाग खरेदी करणार आहेत. यासाठी त्यांनी स्पर्धा प्रधिकरणाकडे अर्ज केले आहेत. मल्टीपल्स ही मालमत्तांचे व्यवस्थापन करणारी कंपनी असून ती आर्थिक सेवा व औषध निर्माण क्षेत्रात कार्यरत आहे.

त्यांनी स्पर्धा प्रधिकरणाला कळवले आहे की, आपण या कंपनीचा भाग खरेदी केल्यामुळे देशातील व्यवसायांमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा निर्माण होणार नाही. १३ जुलै रोजी व्हीआयपी उद्योग व मल्टीपल्स इक्विटी यांनी एकत्र येत दिलीप पिरामल व कुटुंबियांनी ३२ टक्के समभाग विक्रीची घोषणा केली होती. ही खुली ऑफर त्यांनी १३३७.७८ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचे ठरवले होते. व्हीआयपी उद्योगामध्ये प्रवर्तक असलेल्या पिरामल कुटुंबियांचे ५१.७३ टक्के समभाग आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *