बांग्लादेशात पंतप्रधानांविरोधात लाखो नागरकांचे हिंसक आंदोलन

 बांग्लादेशात पंतप्रधानांविरोधात लाखो नागरकांचे हिंसक आंदोलन

ढाका, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले असून आज विरोधकांच्या रॅलीदरम्यान हिंसाचार पसरला. यानंतर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) च्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, ज्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या हिंसाचारात सुमारे 100 लोक जखमी झाले आहेत.

बांगलादेशमध्ये पुढील वर्षी जानेवारीत निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी काळजीवाहू सरकार स्थापन करावे, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. हसिना यांनी मुख्य विरोधी पक्ष बीएनपीवर आरोप केला आहे की त्यांचे नेते मनी लाँड्रिंगद्वारे देशाचा पैसा इतर देशांमध्ये पाठवत आहेत आणि यात सर्वात मोठे नाव बीएनपीच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान आहे.

गेल्या ४५ महिन्यांतील आज झालेले हे सर्वात मोठे निदर्शन होते. दरम्यान देशाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताच ककरेल चौक, सर्वोच्च न्यायालय परिसर आणि सरन्यायाधीशांच्या निवासस्थानासमोर चकमक उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य विरोधी पक्ष बीएनपी आणि सर्वात मोठा इस्लामिक पक्ष जमात-ए-इस्लामी यांच्या १ लाखाहून अधिक समर्थकांनी शनिवारी ढाका येथे रॅली काढली. बीएनपी रविवारी देशभरात संपावर जात आहे. वास्तविक, विरोधकांच्या रॅलीमध्ये सत्ताधारी पक्ष अवामी लीग बैतुल मुकर्रममध्ये शांतता रॅली काढत होती.
हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुर आणि रबर शॉटगनचा वापर केला. यावेळी आंदोलकांनी फुलिस यांच्यावर दगडफेक केली. या चकमकीत त्यांच्या युवा शाखेच्या एका कार्यकर्त्याचाही मृत्यू झाल्याचे बीएनपीने म्हटले आहे. हिंसाचाराचे वार्तांकन करणारे अनेक पत्रकारही जखमी झाले आहेत.

SL/KA/SL

29 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *