विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणावर १६ ऑगस्टला निकाल?
कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणावर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने पुन्हा एकदा निकाल पुढे ढकलला आहे. याप्रकरणी आता १६ ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री साडेनऊला निकाल येण्याची अपेक्षा होती. पण तो पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजन गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशला १०० ग्रॅम वजन अधिक असल्याच्या कारणास्तव अपात्र घोषित करण्यात आले होते. त्या निर्णयाला विनेश मार्फत भारतीय कुस्ती महासंघाने आव्हान दिल्याची माहिती आयओएने दिली. या निकालावर विनेश ला मॅडल मिळणार की नाही ते अवलंबून आहे.