राज्यातील सुमारे पावणे दोन लाख शेतमजुरांना विमासंरक्षण…

 राज्यातील सुमारे पावणे दोन लाख शेतमजुरांना विमासंरक्षण…

मुंबई दि १० — राज्यातील एक कोटी पंचाहत्तर लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर तीन वर्षात सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे अशी माहिती कृषि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.

विरोधी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर उपस्थित केलेल्या नियम २९३ अन्वये अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई पोटी १६, ३८९ कोटींची मदत तर अवकाळी, गारपीट आदी बाबींसाठी १९, ५९२ कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. पीक विमा योजनेच्या गैरवापरासाठी एकाही शेतकऱ्यावर सरकारने कारवाई केलेली नाही. NDRF च्या निकषांच्या बाहेर जाऊन सरकारने नुकसान भरपाई दिली आहे असं ते म्हणाले.

विकेल ते पिकेल यासोबतच निर्यातक्षम पिकांना प्रोत्साहन देण्याचं नियोजन करण्यात येत आहे, AI आधारित नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन शेती अधिक उत्पन्नक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्जमाफी हा एकमेव उपाय शेतकऱ्यांच्या समस्येवर नाही, याउलट शेतकऱ्यांना जे जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देण्यात येत आहे असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी एका समितीचे गठण करण्यात आलं आहे, त्याबद्दलची अधिक माहिती मुख्यमंत्री देतील अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या उत्तरात दिली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *