गाव पंधरा दिवसापासून अंधारात; सरपंच, उपसरपंच पाण्याच्या टाकीवर

बीड, दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील सोनेसांगवी (सुर्डी) गावात पंधरा दिवसापासून लाईट नसल्याने सरपंच आणि उपसरपंच यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत लाईट सुरळीत चालू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आंदोलनात सरपंच मुकुंद कणसे, उपसरपंच राहुल डिकले यांच्यासह तिराम वाघमारे, एजाज शेख, सूरेश गालफाडे हे पाच युवक सहभागी झालेले आहेत.
ML/KA/SL
8 Aug 2023