विक्रांत मेस्सीने चित्रपटसृष्टीतून निवृत्ती न घेतल्याचे सांगत चाहत्यांना दिला दिलासा, नेमकं सांगितलं कारण

अभिनेता विक्रांत मेस्सीने आपण निवृत्ती घेत नसून ब्रेक घेत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. विक्रांतने सोमवारी व्हायरल झालेल्या ‘निवृत्ती’ पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहो. अभिनय जगतातून निवृत्ती घेण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. पण सध्या त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. असं विक्रांत मेस्सीने म्हंटलय. त्यामुळे एक ब्रेक घेऊन पुन्हा चित्रपट करण्यावर विक्रांत भर देणार आहे.