ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विवेक गायकवाड, तर सचिवपदी पत्रकार नासिकेत पानसरे

 ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विवेक गायकवाड, तर सचिवपदी पत्रकार नासिकेत पानसरे

मुंबई, दि. २६ : विक्रोळी कन्नमवार नगर येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळ (रजि.) यांच्या २०२५ ते २०२८ त्रैवार्षिक कार्यकारिणी निवडणूकीत अध्यक्षपदी विवेक विठोबा गायकवाड तर सचिवपदी, समाजभूषण ज्येष्ठ पत्रकार नासिकेत कृष्णकांत पानसरे यांची निवड झाली आहे.

दिपक देशनेहरे आणि विनोद वणीकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
उपाध्यक्ष : निवृत्ती शिदू मस्के
उपसचिव :श्रद्धानंद रावबा निकम,खजिनदार : गौतम निवृत्ती डांगळे
कार्यकारिणी सदस्य :
सुरेश भिकाजी सरनोबत, भुमैय्या रामलू सोमा, राजाराम शंकर क्षीरसागर, बबन बापू माने, दत्तात्रय रामचंद्र धनवडे, सुनिल नारायण गायकवाड यांची निवड झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक गायकवाड आणि सचिव पत्रकार नासिकेत पानसरे यांनी सांगितले की आम्ही सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू आणि प्रभात मित्र मंडळाच्या गौरवशाली परंपरेला पुढे नेऊ. मंडळाचे आगामी उपक्रम हे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक सहभाग यावर केलेले असतील.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *