कांदा प्रश्नी विखे पाटील थेट शाह यांच्या भेटीला

 कांदा प्रश्नी विखे पाटील थेट शाह यांच्या भेटीला

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा प्रश्नी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत. ही भेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत घेतली असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भेटीदरम्यान कांद्यावरील निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार लवकरात लवकर कांदा निर्यातीसंदर्भात निर्णय घेईल, अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.

ML/KA/SL

15 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *