भरमसाठ वीजबिलाबाबत रिपब्लिकन सेना आक्रमक

मुंबई, दि ९
रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब व रिपब्लिकन कामगार सेना राज्याध्यक्ष पत्रकार युवराज दादा बनसोडे यांच्या आदेशाने उल्हासनगर 4 महात्मा फुले नगर भीम कॉलनी, भीम नगर 4 नंबर ओटी उल्हासनगर मधील नागरिकांना गेल्या 4 महिने झाले महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण मंडळाने विज बिल पाठवलेच नाही परंतु वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अंदाजे भरमसाठ वीज बिल पाठवून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या गोरगरीब जनतेला वेडीस धरले आहे जोपर्यंत महावितरण कंपनी वीज मीटरचे रेडींग घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही वीज बिल भरणार नाही असा पवित्र येथील नागरिकांनी घेतला आहे येथील झोपडपट्टी धारकांना महावितरण कंपनीने सुधारित रेडींग विज बिल पाठवले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये महावितरण वीज मंडळाच्या ऑफिस वरती जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा प्रभारी मायाताई कांबळे व रिपब्लिकन कामगार सेना राज्य समन्वयक विक्रम भाई खरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, व उल्हासनगर 4 विद्युत मंडळ वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता इंगळे साहेबांना निवेदन देत असताना रिपब्लिकन कामगार सेना उल्हासनगर शहराध्यक्ष हनुमंत वाघमारे उल्हासनगर सचिव रामराव गायकवाड व सुरेश पांडे श्रीकांत निकाळजे भागवत शिंदे भीमराव पगारे दयानंद तायडे अंकुश राजाभाऊ इंगळे अंबादास नावकर निवेदन देत असताना उपस्थित होते. KK/ML/MS