विजय वैद्य यांचा प्रथम स्मृतिदिन ; आज आदरांजली सभा

मुंबई, दि. १३:– ज्येष्ठ पत्रकार, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानामालेचे संस्थापक आदरणीय विजय वैद्य यांचा उद्या, रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रथम स्मृतिदिन आहे. या निमित्त रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे स्व. विजय वैद्य यांना बी ३७, गांजावाला अपार्टमेंट, तळमजला, किरण डेंटलच्या शेजारी, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असल्याची माहिती सरचिटणीस प्रवीण वराडकर यांनी दिली. तसेच विजय वैद्य यांच्या कर्मभूमी असलेल्या जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय येथे सायंकाळी सात वाजतां स्व. विजय वैद्य यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव वसंत सावंत यांनी दिली.