विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश

 विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश

हरियाणाच्या ‘या’ जागांवरून लढू शकतात निवडणूक, विनेशने नोकरीचा दिला राजीनामा

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोन तगड्या खेळाडूंनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीने हा प्रवेश केला आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाने विनेश फोगाटला हरियाणातील तीनपैकी कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार विनेश दादरीमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे कळते. त्यामुळे तिला तिथले तिकीट दिले जाऊ शकते. त्याचवेळी बजरंग पुनिया हे बदलीमधून तिकीट मागत आहेत, परंतु काँग्रेसने त्यांना या जागेऐवजी जाट बहुल जागेवरून उमेदवारी देण्याचा विचार केला आहे. हरियाणा विधानसभेची निवडणूक ५ ऑक्टोबरला होणार आहे. तर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट यांची भूमिका हरियाणाच्या राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारी ठरू शकते.

दरम्यान, विनेशने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. तिने शुक्रवारी (दि. 6 सप्टेंबर) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली. विनेश भारतीय रेल्वेमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी या पदावर कार्यरत होती.

TR/ML/PGB
6 Sep 2024

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *