विद्यार्थी गुण गौरव समारंभाला उस्फूर्त प्रतिसाद

 विद्यार्थी गुण गौरव समारंभाला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १४
श्रीस्वामी समर्थ सेवा मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा परळ येथील मठाशेजारी असलेल्या सभागृहात जल्लोषात पार पडला.समाजसेवक स्वामीभक्त सचिन शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.
भाजप नेते प्रसाद लाड,शलाका साळवी,नाना आंबोले,शिवसेनेचे आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकिळ, सुधाताई मसुरकर आणि युवा उद्योजक उदय पवार,किरण तावडे शाखाप्रमुख, दिव्या बडवे महिला आघाडी शिवसेना, बबन तावडे मिलिंद गावडे परळचा राजा विश्वस्त उपस्थित होते.
तसेच सुप्रसिद्ध ऍडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आजच्या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध समुपदेशक समर्थ पालकर विशेष आमंत्रित होते त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रातल्या नव्या शैक्षणिक वाटा संदर्भात सखोल माहिती दिली तसेच कोणत्या क्षेत्रात करिअर केल्यास यशस्वी होता येईल याविषयी शास्त्रशुद्ध माहिती दिली. आम्ही दरवर्षी मोठ्या थाटामाटात विद्यार्थी गुणगौर सोहळ्याचे आयोजन करत असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या मदतीचे कोणीतरी कौतुक झाले पाहिजे जेणेकरून पुढील वाटचालीमध्ये ते आणखी जोमाने अभ्यास करून यशाचे टोक गाठतील. यापुढे देखील आम्ही असेच प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती स्वामी समर्थ मठाचे पदाधिकारी सचिन शेट्ये यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *