विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबरला
मुंबई दि २७ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबर पासून चालू होत आहे. हे अधिवेशन अनेक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती काळ चालवायचे तसेच या अधिवेशनात येणारी विधेयके व कामकाजाचा क्रम ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता विधान भवनात आयोजित केल्याचे विधानमंडळाचे अवर सचिव देबडवार यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या तसेच दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षांसह विरोधक देखील निवडणुकीच्या कामाला लागले आहेत त्यातच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ८ डिसेंबर पासून नागपूर येथे चालू होत आहे. शेतकरी पॅकेजसाठी सत्ताधाऱ्यांना नागपूर अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका या पार पडत असल्या तरी ५०% टक्के चावर आरक्षण गेल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे देखील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील कोकण सह ,विदर्भ, मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र. या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी अनुदानाबरोबर कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारचे अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे. त्यामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांचे कर्जमाफी बाबत निर्णय घ्यायचा असल्यास केंद्रातील मदतीसह राज्य सरकारकडून मिळणारी मदत या दोन्ही निकषावर नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जाणार असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचे असल्याचे राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी कडून बोलले जात आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे ८. डिसेंबर पासून चालू होत असून या अधिवेशनाचा कार्यकाळ किती असावा तसेच या अधिवेशनात कोणती विधेयके मांडण्यात येणार आहेत याबाबतची चर्चा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे . नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १ डिसेंबर रोजी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस महत्त्व प्राप्त झाले आहे. ही बैठक विधान मंडळाच्या कक्ष क्रमांक ०४० तळमजला येथे दुपारी २.३० वाजता होत असून याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र विधान मंडळाचे अवर सचिव देबड वार यांनी विधान मंडळ व विधान परिषदेतील कामगार सल्लागार समितीवर असणाऱ्या सर्व सदस्यांसहित राज्य शासनाच्या सचिवालयाला पाठवले आहेML/ML/MS