विधानसभेच्या उपाध्यक्षानी मारली मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आज (दि.४) दुपारी १ च्या सुमारास उडी मारली. ते सुरक्षा जाळ्यात अडकले. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, झिरवळ यांनी आदिवासी आमदारांसोबत तेथेच आंदोलन केले. किरण लहामटे, काशीराम पावरा हेही आमदार आंदोलनात सहभागी झाले आहेत.
धनगर समाजाला आरक्षण देण्य़ाचे आश्वासन राज्य सरकारने पुन्हा एकदा दिले आहे. याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांनी आज मंत्रालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपल्याच सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र, इमारतीच्या बाहेर सुरक्षा जाळी असल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या समर्थकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. या घटनेनंतर मंत्रालयातच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ML/ML/PGB 4 Oct 2024