विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान, निकालही तेव्हाच

 विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला मतदान, निकालही तेव्हाच


मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान घेण्याचे निश्चित केले आहे. विधान परिषदेतील ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलैला संपत असल्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तसेच १२ जुलैला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे. विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात या ११ जागांसाठी चुरस रंगणार आहे. निवडणुकीसाठी अधिसूचना २५ जूनला जारी केली जाणार आहे.

• अशा होतील निवडणुका
नोटिफिकेशन : मंगळवार २५ जून
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : मंगळवार २ जुलै
उमेदवारी अर्जांची छाननी : बुधवार ३ जुलै
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : शुक्रवार ५ जुलै
मतदान : शुक्रवार १२ जुलै 2024
मतदानाची वेळ : सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी : शुक्रवार १२ जुलैला संध्याकाळी ५ वाजता

ML/ML/PGB 18 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *