विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरण… ठाकरे गट न्यायालयात

नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेचे सदस्य विप्लव बजोरिया, मनिषा कायंदे आणि उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या कारवाईबाबत विधिमंडळात हालचाल होत नसल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे.
उद्या मुंबई उच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून याबाबत उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर कारवाईसाठी ठाकरे गटाकडून मागणी असल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती घेत असल्याची माहिती विधानपरिषद सूत्रांनी दिली आहे.
नीलम गोऱ्हे वगळता ठाकरे गटाकडून इतर दोघांबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनात नीलम गोऱ्हे यांच्याबाबत अपात्रतेच्या कारवाईची नोटीस असली तरी विधि मंडळात काम करण्यास गोऱ्हे यांना काहीही अडचण नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
ML/KA/SL
7 Dec. 2023