विधान भवन शिवसेना कार्यालयाचा ताबा आता शिंदे गटाकडे ?

 विधान भवन शिवसेना कार्यालयाचा ताबा आता शिंदे गटाकडे ?

 

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधान भवनातील शिवसेना पक्षाचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली असून येत्या एक दोन दिवसात ते केले जाईल अशी शक्यता आहे .Vidhan Bhavan Shiv Sena office now in possession of Shinde group?

शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून विधान भवनातील शिवसेना पक्षाचे कार्यालय ताब्यात घेणे आता त्यांच्यासाठी महत्त्वाचे झाले आहे. मागील मुंबई येथील अधिवेशनात हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते तर नागपूर ला मुख्य कार्यालय ताब्यात घेऊन ठाकरे गटाला दुसरे कार्यालय देण्यात आले होते.

येत्या २७ तारखेपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबई विधान भवनातील कार्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर त्या तातडीने होण्याची शक्यता आहे.

ML/KA/PGB
19 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *