विधान परिषदेच्या सभापदी पदावर राम शिंदे यांची निवड जाहीर…

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधान परिषदेचे सभापती म्हणून प्रा.राम शंकर शिंदे यांची आज विधान परिषदेत आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली आहे. या संदर्भात सभापती नीलिमा गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली.
सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे , उमा खापरे, शिवाजी गर्जे यांनी सभागृहात मांडला. या प्रस्तावाला सदस्या मनिषा कायंदे , अमोल मिटकरी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. प्रा.राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून पदभार सोपविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्या बद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील शिंदे यांचे अभिनंदन केले, दोन्ही बाजूच्या सदस्यांना न्याय देण्याचे आश्वासन देत प्रा शिंदे यांनी सभागृहाचे आभार मानले.
ML/ML/PGB 19 Dec 2024