Videocon चे प्रमुख वेणूगोपाल धूत यांना अटक
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना आज आर्थिक फसवणूक प्रकरणी CBI ने मुंबईमधून अटक केली आहे. ICICI बॅंकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान शुक्रवारी (दि. 23) CBI ने या प्रकरणात ICICI बॅंकेच्या माजी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ चंद्रा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. चंद्रा कोचर यांनी 2018 मध्ये ICICI बॅंकेच्या सीईओ पदावरून पायउतार झाल्या होत्या. चंदा कोचर यांच्या कारकीर्दीत आयसीआयसीआय बँकेकडून नियमांचे उल्लंघन करून व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज देण्यात आलं होत.
त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटींचं कर्ज देण्यात आलं होत. या कंपनीत दीपक कोचर यांची ५० टक्के भागिदारी होती. त्यामुळे हा सगळा घोटाळा कसा झाला ते समोर आलं. आता या प्रकरणात वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय उद्योग आणि बॅंकीग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
SL/KA/SL
26 Dec. 2022