ठाण्यात होणाऱ विदर्भवासीयांसाठी भव्य स्नेहसंमेलन

मुंबई . दि.3
विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज यांच्या वतीने 28 वे विदर्भ बांधवांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भाचे सुपुत्र परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक उपस्थित राहणार असून सरनाईक यांना विदर्भभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विदर्भ वैभव मंदिर हे मुंबईतील नामवंत संस्था असून या संस्थेतर्फे सामाजिक शैक्षणिक आणि कला क्रीडा या विभागासाठी विशेष उल्लेखनीय कार्य केले जाते या कार्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले असून ते नामांकित कंपनीमध्ये तसेच अनेक मोठ्या मुद्द्यावर शासन दरबारी काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा सत्कार समारंभ घेतला आहे.तरी मुंबईतील तसेच ठाणे परिसरातील विदर्भीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघ मुंबई चे सरचिटणीस गजानन नागे यांनी केले आहे.