विदर्भाचे नंदनवन चिखलदरा गारठला, पारा 9 अंशावर…

 विदर्भाचे नंदनवन चिखलदरा गारठला, पारा 9 अंशावर…

अमरावती दि.२७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा आता थंडीने गारठला आहे. सध्या या ठिकाणी वातावरणात झालेल्या बदलांमुळे थंडी वाढली आहे. पारा 9 अंशावर आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मेळघाटातील घनदाट जंगलात वसलेल्या चिखलदऱ्यात सध्या सकाळच्या वेळी धुकं बघायला मिळत आहे.

चिखलदऱ्याचे वातावरण सध्या अल्हाददायक झालं आहे. अंगात हुडहुडी भरणारी थंडी सध्या चिखलदऱ्यात आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटक गारव्यापासून बचाव करण्यासाठी गरम कपडे आणि दिवसाही शेकोटी पेटू लागले आहेत. हळूहळू पर्यटकांची गर्दी आता पर्यटना साठी प्रसिद्ध असणाऱ्या चिखलदऱ्याकडे वळताना दिसत आहे.

ML/ML/SL
27 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *