उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी
नवी दिल्ली दि ९– उपराष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे तब्बल 452 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला रेड्डी यांना 300 मते मिळाली.
एडवोकेट जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज उपराष्ट्रपती पदासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी मतदान केले. दोन्ही सभागृहातील सदस्य मिळून 781 जणांनी मतदान केले, त्यातील 15 मतं अवैध ठरली आहेत. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना विरोधकांकडून 14 मते जास्त मिळाली आहेत असे या निवडणुकीत द्वारे स्पष्ट झाले आहे. एनडीए आघाडीकडे एकूण 427 मते होती, मात्र त्यात त्यांना वाय एसार काँग्रेस यांची अकरा मते अधिक मिळाली त्यामुळे 438 मते त्यांच्याकडे होती असं गृहीत धरले जात होते. मात्र प्रत्यक्षामध्ये राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली.
बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली एकूण ७८२ मतांमधील या दोघांची मत विभागणी पाहता 29 मते रेड्डी यांना कमी पडली आहेत. या 29 मतांपैकी 14 मते विरोधी पक्षांकडून सत्ताधारी एन डी ए आघाडीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे आणि तब्बल 15 मते अवैध ठरल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.ML/ML/MS