ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव बोऱ्हाडे यांचे निधन…

नाशिक, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या, तसेच नाशिकमध्ये झालेल्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकरराव बोऱ्हाडे यांचे काल निधन झाले.
विडी कामगारांच्या प्रश्नांना देखील त्यांनी आपल्या साहित्यातून वाचा फोडत त्यांच्या प्रश्नांवर मोठे काम केले होते. तब्बल चार दशकांहून अधिक काळ साहित्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. बोऱ्हाडे यांनी सार्वजनिक वाचनालय नाशिक, लोकहितवादी मंडळ नाशिक अशा संस्थांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या कामातून त्यांनी नाशिकच्या साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
साहित्यिक शंकरराव बोऱ्हाडे यांच्यावर नाशिक येथील गुरुजी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल सायंकाळी ७ वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. डॉ. बोऱ्हाडे यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Veteran writer Shankarao Borhade passed away…
ML/KA/PGB
27 Nov 2023