ज्येष्ठ गायक संजय मराठे यांचे निधन

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक आणि हार्मोनियम, ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात युवा तडफदार गायक भाग्गेश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सूना नातवंडे असा परिवार आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नुकत्याच जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता.आपले धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी संगीत मंदारमाला हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आज देखील त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ९ वाजता जवाहर बाग स्मशानभूमीत करण्यात आले.
ML/ML/SL
16 Dec. 2024