ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे (९४) यांचे गुरूवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी ‘स्पेशल २६’, ‘द इम्पॉसिबल मर्डर’, ‘सावित्री बानो’, ‘मनन’, ‘माझे मान तुझे झाले’, ‘बेट’, ‘फुल ३ धमाल’ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून भूमिका केल्या. ‘प्रपंच’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते.रंगभूमी तसेच अनेक जाहिरातीतही त्यांनी कामे केली होती. ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते या त्यांच्या बहिणी होत्या.