ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

 ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपटसृष्टीतील महत्वाचे चरित्र अभिनेते रवींद्र बेर्डे (७८) यांचे काल मध्यरात्री निधन झाले. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे रवींद्र बेर्डे यांचे सख्खे भाऊ आणि नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत भाऊ आहेत.

रवींद्र बेर्डे यांनी तीनशेहून अधिक मराठी चित्रपटातून काम आहे. १९६५ पासून आकाशवाणीवर नभोनाटयांचे दिग्दर्शन करता करता त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध आला. १९८७ साली त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आजवर ३१ नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. त्यांचे एकूणच व्यक्तिमत्व आणि काहीसा विनोदी स्वभाव यामुळे सुरुवातीला खलनायकी आणि नंतर विनोदी व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. मालिका, जाहिराती, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी काम केले होते.

‘होऊन जाऊ दे’, ‘हमाल दे धमाल’, ‘थरथराट’, ‘चंगु मंगु’, ‘उचला रे उचला’, ‘बकाल’, ‘ धडाकेबाज’, ‘गंमत जंमत ‘, ‘ झपाटलेला’, ‘भुताची शाळा’ अशा कित्येक मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले होते.

SL/KA/SL

13 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *