ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन
मुंबई, दि. 24 : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (89) यधर्मेंद्र यांनी आज दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. थोरला पुत्र सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी अमिताभ बच्चन आणि आमिर खानसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.. धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी 1960 च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी शोलेपासून ते धर्मवीर, मेरा गाव मेरा देश आणि सीता गीता अशा 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. धर्मेंद्र यांनी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दमदार काम केले होते. त्या चित्रपटात धर्मेंद्र यांनी रणवीर सिंगच्या आजोबांची भूमिका केली होती.
धर्मेंद्र यांचा इक्किस हा सिनेमा त्यांचा अखेरचा ठरला. हा सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे. विषेश म्हणजे उद्याच हा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांना शेवटचे स्क्रिनवर पाहता येईल. या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा मुख्य भूमिका साकारत आहे. धर्मेंद्र या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते, त्यांनी सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला होता. “इक्किस” हा सिनेमा येत्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल मान्यवरांचे शोकसंदेश
धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते, एक असाधारण अभिनेता होते ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेत आकर्षण आणि खोली आणली. त्यांनी विविध भूमिका ज्या पद्धतीने साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला भिडल्या. धर्मेंद्रजी त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि उबदारपणासाठी तितकेच प्रशंसनीय होते. या दुःखाच्या वेळी, माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील.
मुख्यमंत्री – फडणवीस
धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
सदाबहार अभिनेते धर्मेंद्र आपल्या साठ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या अदाकारीने माझ्यासारख्या अगणित चाहत्यांना निखळ आनंद देण्याचे काम केले. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, ड्रीम गर्ल, दी बर्निंग ट्रेन, मेरा नाम जोकर, अपने, लाईफ इन अ मेट्रो, यांसारख्या असंख्य सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप रसिकांच्या मनावर उमटवली. बॉलिवूड हिरोच्या प्रतिमेला धर्मेंद्र यांनी नवीन आयाम मिळवून दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
SL/ML/SL