अंबरनाथ मध्ये आढळला अतिदुर्मिळ विषारी पोवळा साप..

ठाणे दि १०– अंबरनाथ येथील शिवगंगा नगर स्वामी समर्थ बिल्डिंग ला पातळ बारीक गांडूळ सारखा दिसणारा दोन एम एम पातळ साप आढळला , तो पाहून सर्पमित्र आकाश गोहिल यांना कॉल आला. हा वेगळ्या प्रकारचा साप बिल्डिंग मध्ये फिरत आहे असे बिल्डिंग चे लोकांनी सांगितले. त्यावेळी तो अति दुर्मिळ पोवळा जातीचा अत्यंत विषारी आढळून आला आहे.
इंग्रजीत याला (slender coral) स्लेंडर कोरल साप म्हणतात. आपल्या भारतात नाग,मणियार,घोणस,फुरसे, हिरवी घोणस, किंग कोब्रा आणि पोवळा हे विषारी सापडतात. सर्पमित्र आकाश गोहिल यांनी सांगितले की हा पोवळा साप बारा इंच लांब आहे, जास्तीत जास्त तो अठरा इंच परत लांब असतो. तो बारीक किडे आणि त्यांची अंडी खातो. हा साप निशाचर आहे, दिवसा कमी दिसतो या पोवळा सापाचे शरीर चॉकलेटी पोटाचा रंगाचे, केशरी गुलाबी, तोंडाचा रंग काळा आणि शेपटीला दोन काळे निशाणी असते .