महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग

 महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहर व जिल्ह्यात वाळू माफियांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महसूल पथकांना सातत्याने टार्गेट करण्यात येत असून, सध्या या वाळू माफियांवर नजर ठेवण्यात येत आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मोटारसायकलवरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने महिला तहसीलदारांचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या पाठलाग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलिसांना दिले आहेत.

शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व विक्री जोरात सुरू आहे. जिल्ह्यातील गिरणा, तापी, बोरी, पांझरा यांसह इतर नद्यांतून वाळू उत्खनन, वाहतूक होत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महूसल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांची संयुक्त पथकेही नियुक्त केली आहेत. या पथकांद्वारे नियमित अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विनाभांडवली कोट्यवधींची कमाई करून देणारा उद्योग म्हणून वाळूच्या धंद्यात हजारो लोक गुंतले असून, वाळू राखण करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेवर पाळत ठेवण्यासाठी वाळूमाफियांकडून पथके नियुक्त आहेत. शासकीय कार्यालये, पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे निवासस्थान आणि नद्यांपर्यंतच्या टप्प्यातील प्रमुख हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या पथकातील सदस्य करीत आहेत. कारवाईसाठी गेलेल्या प्रशासकीय पथकांवर वाळूमाफियांकडून हल्ले केले जात आहेत. महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग

ML/KA/PGB
15 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *