व्हेजी कोरियन पॅनकेक

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
गाजर, कोबी, झुकीनी, ढब्बु, कांदा, कांद्याची पात, मश्रूम आणि कोथिंबीर
बटाटा, रताळ ,पालक वैगरे छान लागतात अस मैत्रीण म्हणाली.
मिठ, मिरपुड, मिरची, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ,चमचाभर कॉर्नफ्लावर / कॉर्नस्टार्च आणि तेल.
क्रमवार पाककृती:
कृती साधारण आपल्या धिरड्याच्या जवळपास जाणारी आहे.भरपूर भाज्या असल्याने पोटभर आणि हेल्दी पण आहेत.
मोठ्या भांड्यात चिरलेल्या भाज्या घेऊन चवीनुसार त्यात मिठ, बारीक चिरलेली मिरची, मिरपुड घालून त्यात साधारण १ ते सव्वा कप मिक्स पिठ थोड थोड करत घातलं. ह्या पॅनकेक मध्ये भाज्या जास्त आणि पीठं नावाला घालायच आहे आणि अगदी थोडंस पाणी छान ओलसर होण्यासाठी
आता तव्यावर तेल लावून चमच्याने ते मिश्रण साधारण गोल पसरवायचं. एक बाजू छान कुरकुरीत झाली की पलटून दुसर्या बाजूने पण तेल लावून भाजायचे.
ML/ML/PGB
28 Jun 2024