राष्ट्रपतींकडून G-20 च्या पाहुण्यांना शाकाहारी मेजवानी

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आलेले आहे. या डिनरमध्ये सर्व शाकाहारी पदार्थांचा मेनूमध्ये समावेश करण्यात आला आहे. या डिनरसाठी राज्यांचे प्रमुख, प्रतिनिधी, भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांसह एकूण 170 लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.
डिनर मेनू ‘वसुधैव कुटुंबकम एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेला समर्पित आहे. काश्मिरी कहवा, दार्जिलिंग चहा, मुंबई पाव, अंजीर-पीच मुरब्बा यासह देशातील अनेक प्रसिद्ध पदार्थांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
मेन्यूवरही प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिलेले आहे. भारतातील परंपरा, चालीरीती आणि विविधता लक्षात घेऊन मेनूची निवड व रचना करण्यात आली. जेवणासाठी भारत मंडपममध्ये उपस्थिप पाहुण्यांच्या स्टेजच्या बॅकग्राऊंडला नालंदा विद्यापीठाची झलक देण्यात आलेली होती.
SL/KA/SL
10 Sept. 2023