औद्योगीक विजेची मागणी वाढली, डेटा सेंटरसाठीची वीजही तयार…
मुंबई दि १७ : राज्यात औद्योगिक विजेची मागणी २३ टक्क्यांनी वाढली आहे, आपल्या स्पर्धेत यासाठी असणाऱ्या राज्यांच्या तुलनेत आपली वीज स्वस्त आहे. पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर उभारण्यासाठी लागणारी साडेचार हजार मेगावॉट वीज आपल्याकडे तयार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली. पुढील पाच वर्षांत राज्यातील विजेचे दरही वाढणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात आली आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
महावितरण ने आतापर्यंत एक लाख कोटींचा महसूलचा टप्पा ओलांडला आहे त्यामुळे देशात ही सर्वात मोठी कंपनी ठरली आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पूर्वी रात्री वीज जास्त उपलब्ध असल्याने आपण त्यावेळी सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येत होता. आता दिवसा वीजपुरवठा वाढला आहे त्यामुळे आता दिवसा सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत २५ टक्के सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.ML/ML/MS